बालगंधर्व (Balgandharv): एका युगाची आठवण


नुकताच “बालगंधर्व” चित्रपट पाहण्याचा योग आला. चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच त्याला पाहण्याची ओढ होती. इंटरनेटवर या चित्रपटाबद्दल गोंधळलेल्या प्रतिक्रिया येत आहेत. movie पाहिल्यावर तसंच होतं.

“मुळात बालगंधर्व आणि त्यांची अजरामर गीते” हा नव्या पिढीसाठी संशोधनाचा विषय आहे. दादासाहेब फाळक्यांच्या चलत चित्रांमुळे बालगंधर्वांच्या नाटक कारकीर्दीवर फार मोठा आघात झाला. काळाच्या ओघात बालगंधर्व लोकांच्या स्मरणातून नाहीसे होऊ लागले. त्यांच्या रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची क्वालिटी नवनवीन सदाबहार गाण्यापुढे फिकी पडू लागली. पण ज्या लोकांनी गंधर्व आणि त्यांच्या गाण्यांना जवळून अनुभवलं होतं त्यांच्या मनात ते अजरामर झाले होते.

Balgandharva_YoursPJ

Balgandharva_YoursPJ special

फार काही लिहिण्यापेक्षा थोड्या शब्दात माझं निरीक्षण मांडतोय.

१. देवदास आणि जोधा अकबर चे भव्य सेट साकारणारे नितीन देसाई यांनी या चित्रपटात देखील  आपले कौशल्य उत्कृष्टरीत्या सादर केले आहे. पण दिग्दर्शनात थोडी कमतरता आढळली. चित्रपटात एका हाताने नमस्कार करण्याची पद्धत दाखवली आहे पण हि पद्धत हल्ली रुजली आहे. त्याकाळी अशी पद्धत नव्हती.

२. गन्धर्वगीतांमधील गोडवा कायम ठेवण्यात आनंद भाटे यशस्वी झाले आहेत. वयस्कर लोकांना गन्धर्वगीतांची मेजवानी मिळाली आहे.

३. ज्यांना गन्धर्वांबद्दल ‘च’कारही माहीत नाही त्यांना या movie मध्ये काही आकर्षण वाटणार नाही. सुबोध भावे चे २ रोल हेच त्यांच्यासाठी आकर्षण असेल.

४. ‘सुबोध भावे’ने गंधर्वांच्या भूमिकेला १००% न्याय दिला आहे. गंधर्वांचे original फोटो आणि सुबोधचे फोटो यांची तुलना होऊ लागली आहे.

५. मध्यान्तारापुर्वीचा भाग अतिशय सुंदर साकारला असून मध्यंतरानंतर मात्र सिनेमाचं वाढतं प्राबल्य आणि गंधर्वांची आपल्या कलेबद्दल निष्ठा दाखवली आहे. पण यामुळे मध्यंतरानंतर गन्धर्वयुगाचा प्रेक्षकांवरचा प्रभाव कमी झाल्याचं दिसतं. दिग्दर्शन इथंच कमी पडलंय.

६. वयस्कर लोकांसाठी एक चांगली बातमी म्हणजे नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांना जुने दिवस आठवणे शक्य झाले आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे सध्याच्या 3 Idiots सारखा मैलाचा दगड ठरला आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांना एका नवीन दमाचा आणि वेगळ्या वळणाचा चित्रपट हवाय त्यांनी गन्धर्वयुगाची सफर केलीच पाहिजे.

या चित्रपटाबद्दल सुबोध भावे काय म्हणतो ते पाहण्यासाठी इथे click करा.

Balgandharv_YoursPJ

Advertisements

About Pratik Joshi

Pratik Joshi is an Electrical Engineering student and Review blogger at YoursPJ.com. His life is inspired by Rani Mukerji. He has ability to review various products and services and good in making third party statements.
This entry was posted in Entertainment, Hobbies and tagged , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to बालगंधर्व (Balgandharv): एका युगाची आठवण

  1. mayur potdar says:

    pratik good job…..

  2. baji says:

    bhava akdam mast hai lai bhari

Comments are closed.